जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील तरूणाची १२ हजार रूपये किंमतीच मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
केतन गोपाल बारी (वय-२३) शिरसोली प्र.बो. येथे परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या तो शिक्षण घेत आहे. कॉलेजला जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ एआर ८५८३) क्रमांकाची मोटारसायकल आहे. ३० जुन रोजी रात्री त्याने त्याची मोटारसायकल घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ती मोटारसायकल चोरून नेल्याचे १ जुलै रोजी सकाळी उघडकीला आले ३ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो. ना. विकास सातदिवे करीत आहेत.