जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून १२ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुना आसोदा रोडवरील समर्थ कॉलनीत भाऊलाल कृष्णदेव चौधरी (वय-३८) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते खासगी नोकरी करतात. २ जुलै रोजी सकाळी भाऊलाल भाजीपाला घेण्यासाठी मोटारसायकलने (एमएच १९ एझेड २०३३) कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. ८.३० वाजेच्या सुमारास बाजार करून आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला ३ जुलै रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स फौ आनंदसिंग पाटील करीत आहेत.