पाचोरा ( प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो से हायस्कूल येथील ई लर्निंग हॉलमध्ये स्काऊट गाईड ऑनलाईन युनिट नोंदणी कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते .
या कार्यशाळेसाठी जिल्हा संघटक बेलवलकर आणि संदीप पाटील उपस्थित होते पंचमडी येथे ए. एल. टी. हे विशेष प्रशिक्षण घेतलेले नगरदेवळा येथील संजय पवार व भातखंडे येथील शिक्षक पाटील यांचे उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ .पर्यवेक्षक आर. एल. पाटील. व ए बी .अहिरे. यांनी स्वागत करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालय यांचे स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन उपस्थित होते. सूत्रसंचालन एम .आर .पाटील. यांनी केले डीगंबर टोणपे व कोळी यांनी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.