पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकपदी प्रा. भागवत महालपुरे व सहनिरीक्षकपदी संजय एरंडे यांची निवड करण्यात आली आहे .
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी या दोघांची निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे आदेशाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ. दिलीप वाघ यांचे शिफारशीवरून निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शक संजय वाघ, विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा उपाध्यक्ष पी. डी.भोसले, नगरसेवक विकास पाटील , नगरसेवक वासुदेव महाजन, नगरसेवक भूषण वाघ, दत्ता पाटील, विनय जकातदार, प्रशासक रणजीत पाटील, शहराध्यक्ष अझहर खान, भडगाव शहराध्यक्ष श्याम भोसले, शशिकांत चंदिले, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, युवक शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, हारुण देशमुख, ए. बी. अहिरे , अपूर्व थेपडे, संजय सूर्यवंशी, विनोद दांडगे , गोपी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.