पारोळा ( प्रतिनिधी ) – सांगवी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत 13 पैकी 13 उमेदवारांनी एक हाती सत्ता मिळवत सोसायटीवर अखेर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.
यावेळी नूतन संचालकांचे माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील, पंचायत समितीच्या सभापती रेखा पाटील, जि प सदस्य रोहन पाटील, जि प सदस्य हिम्मत पाटील यांनी अभिनंदन केले.
वासुदेव भगवान पाटील, ज्ञानेश्वर देवीदास पाटील, रंगराव हरी पाटील ,सुकदेव वामन पाटील, मानसिंग कौतिक पाटील, जितेंद्र बिन्नाथ पाटील, अनिल यादव पाटील ,विठ्ठल लटकन पाटील, गंजीधर रामदास पाटील, बेबाबाई सर्जेराव पाटील, लिलाबाई गोविंदा पाटील ,शालीक ताराचंद भिल, बालू उत्तम पाटील हे विजयी झालेत.
निवडणूक यशस्वीतेसाठी रमेश गोबा पाटील, भिका मोहन पाटील, वाल्मीक गंगाराम पाटील, सरपंच प्रवीण प्रताप पाटील, रवींद्र चुडामण पाटील ,राजेंद्र मन्साराम पाटील, भिका आसाराम पाटील, गोरख आत्माराम पाटील ,संजय सहादु पाटील यांच्यासह ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.