चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मेहुणबारे येथून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या संधर्भात अज्ञात एसमविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहीतही अशी की, कुणाल शांताराम जगताप ( वय-१६ ) रा. मेहुणबारे, ता.चाळीसगाव हा मुलगा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेला चाळीसगावतील पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात परीक्षेसाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. परंतु अद्यापपर्यंत हा कुणाल घरी परत आलेला नाही, दरम्यान नातेवाईकांनी त्याचा परिसरासह नातेवाईकांकडे, मित्रमंडळींकडे विचारपूस केली असता, कुठेही आढळला नाही. दरम्यान कुणालचे वडील शांताराम अशोक जगताप यांनी तीन महिन्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार जालमसिंग पाटील करीत आहे.