रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – हुंड्याच्या पैशांसाठी मानसिक त्रास व शिवीगाळ करत दारूच्या नशेत विवाहितेला मारहाण करणाऱ्या नवर्याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
रायासोनी नगरातील माहेर असलेल्या आश्विनी विशाल पाटील (वय-२६) यांचा विवाह भुसावळ येथील विशाल मधूकर पाटील यांच्याशी झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला हुंड्याच्या पैशांसाठी शिवीगाळ व गांजपाठ करण्यास सुरूवात झाली. पती विशाल पाटील दारू पिऊन मारहाण देखील करत होता विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून सासू, नणंद, नंदोई यांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. ११ जूनरोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती विशाल पाटील, सासू कोकाळाबाई पाटील दोन्ही ( रा. भुसावळ) , नणंद प्रिया अर्जून चौधरी, नंदोई अर्जून चौधरी ( दोन्ही रा. शिरसोली ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना चंद्रकांत पाटील करीत आहेत.