हाडांच्या दुखण्यावर अल्पदरात सल्ला , उपचार
जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या ( शुक्रवार ) जळगावात रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, न जुळलेली हाडे व आजार , इतर सांध्यांच्या विकारांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घेण्यासाठी ही मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी सुविधा जळगावात उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ , पैसे आणि मानसिक ताण वाचणार आहे
डॉ. नरेंद्र वैद्य १० जूनरोजी, अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी २:०० पर्यंत रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी रुग्णांनी 9673859185 / 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा.