जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील खंडेरावनगर भागात अवैध गावठी पिस्तूल जप्त करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे .
जिल्ह्यात अवैध शस्त्र जबळ बाळगण्याचे गुन्हे वाढले असल्याने संशयितांना शोधून कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे .पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोह सुधाकर अंभारे, महेश महाजन, पोना विजय पाटील, प्रितम पाटील, पोकॉ सचिन महाजन, पंकज शिंदे यांचे पथक नेमले होते.
पो नि किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की , जळगाव शहरात खंडेराव नगर भागात राहणारा अश्विन हिरे त्याचे कब्ज्यात एक गावटी पिस्तोल बाळगत असून शहरात दहशत पसरवत आहे. त्यावरुन या पथकाने अश्विन विजय हिरे ( वय २०, रा.खंडेराव नगर ) यास ताब्यात घेवून त्याचे कडून ३० हजार रुपये किमतीची १ गावठी बनावटीची पिस्तोल जप्त केली आहे. त्याचे विरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.