जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या चार जणांवर एमआयडीसी पोलीसांनी धडक कारवाई केली या कारवाईत देशी दारू व गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीचे पो नि प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली २ जूनरोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत संशयित आरोपी अशोक तुकाराम कोळी ( रा. रामेश्वर कॉलनी ) , करण दारासिंग बागडे ( रा. सुप्रीम कॉलनी ) , दत्तू पुना पाटील ( रा. म्हाडा कॉलनी ) आणि अमोल प्रमोद पाटील ( रा. खेडी ) हे चौघे वेगवेगळ्या भागात अवैध देशी आणि गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले या कारवाईत २ हजार ४६० रूपयांची देशी दारू आणि १ हजार ५०० रूपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना .गणेश शिरसाळे, ईम्रानअली सैय्यद, हेमंत कळसकर, योगेश बारी, मुदस्सर काझी, महिला पोलीस निलोफर सैय्यद, पोकॉ चंद्रकांत पाटील, गोविंदा पाटील, मुकेश पाटील, साईनाथ मुंढे यांनी ही कारवाई केली.