यावल ( प्रतिनिधी ) – शेतातील पन्नास हजार रुपये किमतीच्या 50.C नेटाफिम कंपनीच्या 16 mm ठिबकच्या नळ्यां चोरट्यांनी लंपास केल्या यावल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
“विकास गणेश पाटील हा 39 वर्षीय युवक तालुक्यातील सांगवी खुर्द येथे कुटुंबासह राहतो शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. टेंभी शिवारात भगवान पाटील, ( रा. टेंभी खुर्द ) यांचे मालकीचे शेत गट नं. 85 ते नफ्याने करतात. या शेतातील 16 mm ठिबकच्या नळ्या प्रत्येकी 600 मिटर असे सुमारे 18 बंडल गोळा करुन शेतातील निंबाच्या झाडाखाली ठेवले होते.
27 मे रोजी रात्री ते शेतात पाण्याची मोटर पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा शेतातील ठिबकच्या नळ्या सुस्थितीत होत्या. पाण्याची मोटर पाहून ते रात्री शेतातून निघून घरी गेले. 28 मे रोजी शेतात काम करणारे जुलाल पाटील यांनी त्यांना फोन करून सांगितले की, शेतात ठेवलेले ठिबकच्या नळ्यांचे बंडल रात्री चोरी झाले आहे. शेतातील निंबाच्या झाडाखाली ठेवलेले 16mm ठिबकच्या नळ्या सुमारे 18 बंडल प्रत्येकी 600 मिटरचे झाडाखाली दिसले नाही. चोरीची खात्री झाल्याने त्यानी अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.