धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथील पो नि राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोटारसायकलींची चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
धरणगाव शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्यांना मोटारसायकलींची चोरी करणारी टोळीच असल्याची माहिती मिळाली . चार संशयित आरोपींची ओळख पटवल्यावर त्यांनी धुळ्यातून ७ मोटारसायकली काढून दिल्या चोरट्यांकडून आणखी काही मोटारसायकली जप्त होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पो नि राहुल खताळ , स पो नि जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पो ना उमेश पाटील, समाधान पाटील, विनोद संदानशिव, वैभव बाविस्कर यांनी केली. चौकशी सुरु असून संशयित आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची नावे पोलिसांनी उघड केलेली नाहीत.