जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकीच्या भुपेंद्र भारंबे , मयुरी चौधरीची राज्य अजिंक्यपद आटयापाटया स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे या दोघांना महाविद्यालयातर्फे प्रत्येकी 2000 हजार रुपये क्रिडा शिष्यवृत्ती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाची 35 वी पुरुष व 31 वी महिला गट राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धा 18 ते 20 मे दरम्यान शेगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या संघाचे सराव शिबिर सिद्धीविनायक विद्यालयात घेण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा हेमंत इंगळे, डॉ.विजयकुमार वानखेडे, क्रिडा संचालक डॉ. आसिफ खान उपस्थित होते खेळाडूंना स्पधेसाठी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक अनिल माकडे, संघ व्यवस्थापक. लीलाधर पाटील हे रवाना झाले.