जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील एसीला लागणारे तांब्याचे पाईप चोरून नेतांना चोराला रंगेहात पकडले एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला
शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील कांदा विभाग इमारतीच्या मागील बाजूस एअर कंन्डीशनला लावण्यात आलेले तांब्याचे पाईप १५ मे रोजी दुपारी चोरून नेत असतांना अमोल बापू पारधी ( रा. लेबर कॉलनी, जळगाव ) याला जैन व्हॅलीतील कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ६ हजार ९०० रूपये किंमतीचे साडे पाच किलो तांब्याचे पाईप हस्तगत केले पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले १६ मे रोजी सुरक्षा रक्षक मुरलीधर बारी (वय-५५ , रा. शिरसोली ) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अमोल पारधी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना समाधान टहाकळे करीत आहेत.