भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील महिलेचे अंघोळ करून कपडे घालतांनाचे व्हिडीओ व फोटो काढून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला
भुसावळ शहरातील २९ वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ मे रोजी सकाळी महिला अंघोळ करून कपडे घालत असतांना शेजारी राहणारा आरोपी प्रतिक जीवन शिंगारे (वय-३४) याने व्हिडीओ आणि फोटो काढले. हा प्रकार महिलेच्या लक्षात येता त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रतिक शिंगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोउनि प्रदीप चौधरी करीत आहेत.