पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील भडगाव रोडवरील कैला माता मंदिर संस्थान येथे सालाबादप्रमाणे महिषासुर मर्दिनी सप्तमी -अष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय कैला माता महोत्सवात 8 मेरोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत कैला माता करोलीवाली देवीच्या भक्तिगीतांचे जागरण व 9 मेरोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कैला माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा , असे आवाहन कैला माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष जगदीश माथुरवैश्य, कार्यवाह पुरुषोत्तम अग्रवाल, डॉ. अनुप अग्रवाल व उत्सव समितीने केले आहे.