बुलडाणा (वृत्तसंस्था) – जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील 39 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. यावरुन या सर्वांना शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या विसावा आणि सईबाई मोटे रुग्णालयात कोरंटाइन करण्यात आले आहे.
यापैकी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस निरीक्षक तर इतर सर्व पोलीस कॉन्स्टेबल असल्याची माहिती आहे. नागपूर येथील तबलिकीचे 11 जण गेल्या अनेक दिवसांपासून बुलडाणामध्ये थांबलेले असतांना त्यातील तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. यांच्याच संपर्कात आल्याच्या संशयावरून पोलिसांना कोरंटाइन करण्यात आले आहे. यापैकी हायरिक्स मधील 15 पोलिसांचे नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांना सईबाई मोटे रुग्णालयात कोरंटाइन करण्यात आले आहे. तर इतर लो रीक्स मधील पोलिसांना गजानन महाराज संस्थानच्या विसावा या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.








