पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यात ग्रामपंचायत सदस्यां महिलेचा विनयभंग करून धमकी देणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम पाहतात. १ मेरोजी सकाळी महिला ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत कार्यालयात असतांना बापूराव देवकर आणि अनंतराव देवकर यांनी कारण नसता शिवीगाळ केली. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या सासूलादेखील मारहाण करून गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले ग्रामपंचायत सदस्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी बापूराव देवकर आणि अनंतराव देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहेत.