जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील १६ वर्षांच्या मुलीला एकाने फूस लावून पळवून नेले एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली गावात १६ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २८ एप्रिल रोजी सायंकाळी कानळदा येथील किसन बारेला याने अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले पीडित मुलीच्या वडिलांनी २९ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या तरुणाविरोधात तक्रार दिली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी किसन बारेला याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रवींद्र गिरासे करीत आहेत.