जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील २८ वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून अश्लिल फोटो टाकून बदनामी केल्याचे उघडकीस आले आहे सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील २८ वर्षीय तरूणी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान अज्ञात अनोळखी नंबरवरील व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तरूणीची बदनामी होईल या उद्देशाने तरुणीला आणि तिच्या वडिलांना अश्लिल व धमकीचे मेसेज टाकले. तरुणीचे बीभत्स फोटो डिजीटल माध्यमातून तयार करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक विरोधात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि लिलाधर कानडे करीत आहेत .