जळगाव ( प्रतिनिधी ) – नवापूर ते जळगावदरम्यान धावत्या ट्रकमधून तीन लाखांचा माल चोरट्यांनी चोरून नेल्याचे नशरिाबाद टोल नाक्याजवळ उघडकीला.आल्यावर नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील किरण अनिल घाटे यांनी सुरत येथून त्यांच्या वाहनांमध्ये वेगवेगळ्या दुकानदार तसेच कंपन्यांचा माल भरला. सुरत येथून नागपूर येथे हा माल ते घेवून जात होते. नवापूर ते जळगावदरम्यान चोरट्यांनी ट्रकमधून विविध कंपन्यांचे ९ पार्सल असा एकूण २ लाख ९५ हजार २८३ रुपयांचा माल चोरुन नेला. नशीराबाद टोलनाक्यावर ट्रकमधून माल चोरुन नेल्याचा प्रकार किरण घाटे यांच्या लक्षात आला. घाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन २६ मार्चरोजी नशीराबदाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ राजेंद्र ठाकरे करीत आहेत.