जळगाव ( प्रतिनिधी ) – किसनराव नगरातील दत्त मंदिराजवळ पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगलपोत दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेली रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विवेकानंद नगर येथे सुनिता रविंद्र कापसे (वय-५१) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १० मार्चरोजी रात्री त्या शतपावलीसाठी बाहेर निघाल्या होत्या. किसनराव नगरमधील दत्त मंदिराजवळ पायी जात असताना अज्ञात दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत तोडून लंपास केल्याची घटना घडली सुनिता कापसे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ११ मार्चरोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.