जळगाव ( प्रतिनिधी ) – हरिविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा हुंड्यांच्या पैश्यांसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीसह इतर पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीविठ्ठल नगर येथील माहेर असलेल्या शुभांगी दीपक सोनवणे (वय-२२) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील लिधुर येथील दीपक तानकु सोनवणे यांच्याशी झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती दीपक सोनवणे याने विवाहितेचा हुंड्याच्या पैशासाठी छळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करणे, टोमणे मारणे, मानसिक त्रास देणे व मारहाण करणे सुरू झाले. सासू, सासरे, दिर आणि एक जण अशा चौघांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. या विवाहितेने ९ मार्च रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पती दीपक सोनवणे, सासु प्रमिला सोनवणे, सासरे तानकू सोनवणे, दीर मनोज सोनवणे आणि खटूबाई (पूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. लिधूर ) यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहेत .