पाचोरा ( प्रतिनिधी ) – पिंपळगाव हरेश्वर येथील घरकुल वाटपात पंचायत समितीचे काही कर्मचारी मुद्दाम खोडा घालत असून आदिवासी पात्र लाभार्थ्यांना ‘ड’ यादीतून काढून मुद्दाम ‘क’ यादीत टाकले आहे याची चौकशी करावी या मागणीसाठी प्रांताधिकारी विक्रम बांदल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले .
या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आ दिलीप वाघ यांनी केले . यावेळी जिल्हाउपाध्यक्ष शालिग्राम मालकर, प्रवक्ता खलिल देशमुख, माजी तालुकाध्यक्ष विजय कडू पाटील, गौरव शिंदे, राष्ट्रवादी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष जमील तडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, अभिषेक सूर्यवंशी, समसुदीन तडवी. ,रफिक शेख , हासन शहा, इस्माईल शेख , नसीब खान, मुस्ताक शेख ,शकील पठाण, जावेद तडवी , बिस्मिल्ला तडवी, रहमान शेख ,रुबाब शहा, सद्रोद्दिन तडवी ,ईदबार तडवी ,सादिक तडवी , हनीफ शहा यांची उपस्थिती होती प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी चौकशीच आश्वासन दिलं, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडु असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी यावेळी दिला.