पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील बस स्टॅन्ड मागील सावित्रीबाई मैदानावर अंध व अपंग संघाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली. जळगाव विद्या महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ यांनी ही स्पर्धा आयोजित केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक रोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत जळगाव , मुंबई , अमरावती , पुणे , लातूर , नागपूर , या संघाने या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
दिनांक २६ व २७ फेब्रुवारी असे दोन दिवस ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिला सामना जळगाव व मुंबई या संघात दरम्यान झाला. तो सामना या संघाने जिंकला. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघाला सात हजार रुपये उपविजेत्या संघाला पाच हजार रुपये मॅन ऑफ द मॅच ला पाचशे रुपये व मॅन ऑफ द सिरीज ला १ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक संघाला प्रोत्साहनपर पंधराशे रुपये रोख बक्षीसही दिले जाणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र अंध संघाचे राज्य प्रवक्ता ज्ञानेश्वर आहेरकर ,अपंग संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील, अंध संघटनेचे राज्याध्यक्ष हर्षद चक्रधर , महासचिव जीवन मराठे, कोषाध्यक्ष राहुल सिंग, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, योगेश पाटील, लक्ष्मीकांत भिल, वसंत पवार ,उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय भावसार प्रा.डॉ.शैलेश पाटील, बजरंग दलाचे विनोद खाडे, जयवंत चौधरी, राजू महाजन,पलटी भाऊ, राकेश करोसिया, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पहिला सामना जळगाव तो मुंबई यांच्या अतिशय रोमांचकारी ठरला. अंध खेळाडू डोळस असणारे लाजवेल असा अप्रतिम खेळ या दोन्ही संघातील खेळाडूंनी केला. त्यांचा खेळ पाहण्यासाठी पारोळा शहरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
छाया–पारोळा येथे अंध क्रिकेट संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करताना नगरसेवक रोहन मोरे ,रविंद्र पाटील,ज्ञानेश्वर आहेरकर, हर्षद चक्रधर , जीवन मराठे, राहुल सिंग, ज्ञानेश्वर साबळे, योगेश पाटील, प्रा. डॉ संजय भावसार ,प्रा.डॉ शैलेश पाटील