जळगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव येथील दोन लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन उद्या शहरात करण्यात आलेले आहे.
आरोपी 62 वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी व त्याच्या मुलाला देखील या गुन्ह्यात सहआरोपी करावे , पीडित मुलींना शासनाकडून असलेल्या योजना व सुविधांचा लाभ व्हावा म्हणून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोर्चा शिवतीर्थ (जी. एस. ग्राऊंड) ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यत काढण्यात येणार आहे. यावेळी समाजातील मोठ्या प्रमाणात महिला,पुरुष व युवकांची संख्या अधिक असणे आवश्यक आहे , असे आवाहन संयोजकांनी केले आहे.