जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रेयसीच्या भावाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात प्रियकर जखमी झाल्याची घटना काल शहरातील सम्राट कॉलनी भागात घडली . जखमी तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरून प्रेयसीच्या भावाविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जखमी तरुणाची आई हीरा अशोक झाल्टे ( रा. सम्राट कॉलनी ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , त्यांचा मुलगा लखन झाल्टे ( वय 18 ) याचे ईच्छादेवी मंदिराच्या मागे राहणारी मुलगी गायत्री चव्हाण हीचे सोबत प्रेमसंबंध होते. हे मला माहीत आहे. काल रात्री 10.15 वा च्या सुमारास लखन याने माझ्या मोबाईलवर सांगितले की मला रोहीत चव्हाण याने काहीतरी धारदार वस्तूने माझ्यावर वार केले आहेत. शेजारील दिपक जोशी याने सूद्धा सांगितले की लखन वर सम्राट कॉलनी येथे हुडको जवळ रोहीत चव्हाण याने मारहाण केली आहे. व ‘त्याला सिव्हील हॉस्पीटल येथे पाठिलेले आहे तुम्ही सव्हिल हॉस्पीटल येथे जा. आम्ही सिव्हील हॉस्पीटल येथे गेल्यावर समजले की माझा मुलगा लखन झाल्टे याच्या मानेवर, पाठीवर, हातावर वार झालेले असून त्याच्यावर सिव्हील हॉस्पीटल येथील डॉक्टर उपचार करत होते.