मुंबई (वृत्तासनस्थ) – कोरोना व्हायरसबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही पाऊल ठेवण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा दौलताबादमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दौलताबादच्या बस स्टॉप, छोटी मंडी येथील 53 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पहिल्यांदाच औरंगाबादच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलं आहे. याबरोबरच शहरातील असेफिया कॉलनीतील 39 वर्षीय महिलासुद्धा कोरोनाबाधित आढळून आली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात दिवसभरात एकूण 4 कोरोनाग्रस्त आढळून आल्यानं कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 53 वर पोहचला आहे.