मुंबई ( प्रतिनिधी ) – शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला खटल्यात भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. ते आता न्यायालयासमोर शरण होत आहेत. त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली दरम्यान नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे.
”काल सेशन कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण मी आज स्वत:हून, कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वत: सरेंडर होण्यासाठी जात आहे.” असं नितेश राणे यांनी सांगितलं. यानंतर ते कोर्टाच्या दिशेने रवाना देखील झाले.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे.