नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर योजना तयार करण्याचे आवाहन कॉंग्रेसने शनिवारी केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही लॉकडाऊनच्या वेळी ‘अर्थव्यवस्थेचा लॉकआऊट’ असल्याचं सांगितलं आणि अशा परिस्थितीत सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. सिब्बल यांनी दिल्लीत पत्रकारांशी समाज माध्यमातून सवांद साधला. त्यांनी पत्रकारांना सांगितले कि, तुम्ही पंतप्रधानांना सल्ला द्यावा. तर कधी कधी काँग्रेसचा पण सल्ला घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरोना विषाणूच्या पराभवानंतर आपल्याला नव्या भारताचे निर्माण कराचे आहे. सर्वानी मिळून देशाला पुढे नेऊया. सरकाने अशा मुद्द्यावर लक्ष द्यावे जे देशाला पुढे घेऊन जातील. त्यापैकी शिक्षण आणि आरोग्य ही महत्त्वाची समस्या आहे. पंतप्रधानांनी यावरील आपली योजना काय आहे हे स्पष्ट केले पाहिजे. सिब्बल म्हणाले की, पंतप्रधान स्वावलंबी असल्याची चर्चा करतात. जर भारताला स्वावलंबी व्हायचे असेल तर ते कसे करणार ? आम्ही बाहेरील कंपन्यांवर अवलंबून आहोत. ते म्हणाले की, कच्च्या तेलाची किंमत २० डॉलरवर गेली आहे आणि पेट्रोल आणि डिझेलची किंमत तशीच आहे. आपण जनतेला याचा फायदा का देत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात झालेल्या वाढीचा उल्लेख करीत सरकारने हे पाऊल का उचलले, असा सवाल केला. त्यांनी आपत्ती प्रतिसाद कायदा -२००५ कायद्यानुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांचा समावेश असलेला एक राष्ट्रीय अधिकार समिती असते. त्याअंतर्गत राष्ट्रीय योजना तयार कराव्या लागतात. सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय योजना तयार करावी. या कायद्यांतर्गत लोकांना पुरविल्या जाणा सोयी सुद्धा सांगाव्यात. पुढे बोलताना ते म्हणाले कि, काही आंतरराष्ट्रीय संस्थेच्या म्हणण्यानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर कोसळणार आहे. यासाठी सरकारने तयार असायला आहे. राज्य सरकारकडे आर्थिक बॉल नाहीय अशा राज्यसरकारांना सरकाने आर्थिक पाठबळ द्यावे अशी मागणी त्यांनी केलं.