जळगाव प्रतिनिधी) : पिंप्राळा भागातील रहिवासी असणाऱ्या होमगार्डला घरी असताना अचानक छातीत कळ आली. कुटुंबीयांनी त्याला खाजगी दवाखान्यात दाखल केले. तेथून शासकीय रुग्णालयमध्ये नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. आज बुधवारी दि. १२ जानेवारी रोजी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा शिवारातील रहिवासी विजय शंकर साळुंखे (वय ३५) हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे होमगार्डची नोकरी करतो. बुधवारी तो घरी होता. दुपारी २ वाजता अचानक त्याच्या छातीत कळ आल्याने तो कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.
तेथील डॉक्टरांनी तपासणी करून सरकारी दवाखान्यात न्यायला सांगितले. विजय साळुंखे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तपासणी करीत वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी मृत घोषित केले. दरम्यान, विजयच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. विजयच्या मृत्यूमुळे पिंप्राळ्यात शोककळा पसरली आहे.