चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – येथील डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली अनोळखी इसमाने आत्महत्या केली रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव डाऊन रेल्वे लाईनवरील कि.मी. ३२५/२७ , ३२६/०१ दरम्यान गाडी क्र. ०२१३१ या धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी इसमाने (अंदाजे वय-४५ ते ५०) आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली या घटनेने परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी हे ठिकाण गाठून पंचनामा केला. मयताची ओळख अद्याप पटलेली नसून मृताचा उजवा पाय जन्मताच लहान आहे. त्यामुळे तो अपंग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटावी यासाठी मो. ९५२७९३१९२०, ०२५८९-२२३५८४ वर संपर्क करण्याचे रेल्वे पोलिसांनी आवाहन केले आहे. पुढील तपास हवालदार नागेंश दंदी हे करीत आहेत.