जळगाव ( प्रतिनिधी ) – व्यवसायासाठी १० लाख रुपये माहेरहून आणावे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ३ जणांविरूद्ध रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
गणपतीनगरातील माहेर असलेल्या रेखा मराठे यांचा जळगाव शहरातीलच पार्वतीनगर येथील योगेश अरुण मराठे यांच्याशी विवाह झाला लग्नानंतर काही दिवसांनी रेखा यांनी व्यवसाय करण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत यावरुन पतीसह सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. यावरून रेखास वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करत पतीसह सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. छळाला कंटाळून रेखा मराठे यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पती योगेश मराठे , सासू विठाबाई मराठे , जेठ डिगंबर मराठे ( तिघे रा. पार्वतीनगर ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास मपोहेकॉ रत्ना मराठे करीत आहेत.