जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा हुडको येथे घरगुती भांडणातून मुलाने आईला चाकू मारुन जखमी केल्याची घटना घडली मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शमीम बानो शेख पिरन ह्या (वय ४०, रा. महापालिकेच्या दवाखान्याच्या मागे पिंप्राळा हुडको) येथे वास्तव्यास आहे. सोबत त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील (वय २३) हा सुध्दा राहतो. रविवारी घरगुती भांडणावरून तन्वीर याने आई शमीम हिच्या उजव्या हातावर भाजी कापण्याचा चाकू मारून दुखापत केली. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली.
शमीम बानो शेख पिरन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील याच्या रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो ना ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.