भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी परीसरात केमिकल फॅक्टरीला मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली.
आगीचे स्पष्ट कारण लगेच कळू शकले नाही. मंगळवारी सकाळी कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्यावर नागरीकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली. रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.