पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली पाचोरा तालुका उपाध्यक्षापदी प्रा.सुनिता मुनीर सोहत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत पाचोरा शहराध्यक्षपदी सौ रेश्मा सुनील नवगिरे , पाचोरा शहर सचिवपदी सौ कीर्ती अजय अहिरे यांची नेमणूक करण्यात आली याबाबतचे नियुक्तीपत्र पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या राज्य सचिव सौ प्रतिभा शिरसाठ, पाचोरा तालुका अध्यक्षा प्रा. वैशाली बोरकर, नगरसेविका सौ सुचेता वाघ, भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, भडगाव युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, संदीप चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.