गुजरा – गुजरातमधील सूरत शहरातील सचिन भागात केमिकलने भरलेल्या टँकरमधून केमिकल लीक झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात २० हून अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्यानं त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सचिन परिसरातील जीआयडीसीतील आहे. या परिसरात अनेक रासायनिक कारखाने आहेत. येथे टँकरमध्ये रसायनाची गळती झाली.
त्यानंतर तेथे काम करणाऱ्या मजुरांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरला. हा वायू इतका विषारी होता की ६ जणांना जीव गमवावा लागला. यासोबतच अनेक मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जीआयडीसीतील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक ३६२ च्या बाहेर १० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरपासून १० मीटर अंतरावर मजूर झोपले होते. या घटनेत जखमी झालेल्या २० हून अधिक जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमधून रसायन टाकले जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या ८ जण व्हेंटिलेटरवर आहेत.
एक टँकर चालक नाल्यात विषारी रसायन टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली. वायू हवेच्या संपर्कात आला. पोलीस घटनास्थळी या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त समजताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.