पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डॉ. व्ही. एम्. जैन माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त महिला शिक्षिकाच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश करोडपती तर प्रमुख अतिथी म्हणून संचलीका मंगला करोडपती व सचिव डॉ. सचिन बडगुजर उपस्थित होते , व्यासपीठावर मुख्याध्यापक विजय बडगुजर व हेमंतकुमार पाटील, सौ एम यू करोडपती इंग्लीश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य स्वाती बलखंडे उपस्थित होत्या . यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सावित्री बाईंचे विचार सांगितले
सौ मंगला करोडपती यांच्यां हस्ते शिक्षीका प्राजक्ता बडगुजर ,वैशाली सावंत, वैशाली सालुखे, उज्वला पाटील, भाग्यश्री पवार, वैशाली पाटील , तृप्ती मोरे यांना शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले. आभार दिपक भावसार यांनी मानले.