जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात आज ५ कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत उपचारांसाठी होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची संख्या आता १६ झाली आहे .
आज जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार , जिल्ह्यात आज १ कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. जिल्ह्यात सध्या ११ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत , एका रुग्णावर विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत . डीसीएचसी कक्षात ६ आणि डीसीएच कक्षात २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत . एका रुग्णावर उपचारांसाठी त्याला प्राणवायू द्यावा लागलेला आहे . जिल्हयात सध्या लक्षणे नसलेले १६ आणि लक्षणे असलेले ८ असे २४ रुग्ण उपचार घेत आहेत . आज जळगाव शहरात १ , भुसावळला २ , चोपड्यात १ आणि यावल येथे १ रुग्ण आढळला आहे . जिल्ह्यात सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ . १८ टक्के आहे