जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील समस्त बारी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी विजय बारी यांची आज निवड करण्यात आली . आज वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी वर्षासाठी कार्यकारिणीची निवडही करण्यात आली .
समस्त बारी पंच मंडळ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन कार्यकारिणी निवड आज जोशी पेठ येथील बारी समाज हितवर्धिनी हॉल याठिकाणी करण्यात आली होती . शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
प्रारंभी संत श्री रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर गत वर्षातील ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक मंडळाचे सहसचिव मयुर बारी यांनी केले . सभेचे मागील वर्षाचे अहवाल वाचन मंडळाचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी केले. पुढील वर्षातील कार्यक्रमाची रूपरेषा सर्वानुमते ठरविण्यात आली. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन मंडळाचे नवनिर्वाचित सहसचिव महेंद्र बारी यांनी केले
या सभेत सन २०२२-२३ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विजय बारी (अध्यक्ष) , अरुण बारी (उपाध्यक्ष) , हर्षल बारी (सचिव), महेंद्र बारी (उपसचिव) , बालमुकुंद बारी (खजिनदार) , लतीश बारी (सहखजिनदार) , नितीन बारी (प्रसिद्धीप्रमुख) , मयूर बारी (सहप्रसिद्धीप्रमुख) , सुनील बारी (सदस्य), विजय बारी (सदस्य) , राहुल बारी (सदस्य), राजेंद्र बारी (सदस्य) यांची निवड करण्यात आली . समाज बांधवांना सदस्य नोंदणीचे आवाहन समस्त बारी पंच मंडळ यांनी केले आहे. . सभेसाठी समस्त बारी पंच कार्यकारीणी यांनी परिश्रम घेतले.