पहूर ता. जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला कुटुंबीयांसह राहते. गावातील गणेश भागवत मोहिते ३१ डिसेंबररोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान महिलेच्या घराच्या खिडकीतून आत आला. संशयित आरोपी गणेश मोहितेने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिला तिच्या घराच्या खिडकीतून बाहेर ओढत नेले. घराच्या बाजूच्या बांधकाम चालू असलेल्या घराच्या रूममध्ये घेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला.महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी गणेश भागवत मोहिते (वय-३२) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी भारत काकडे करीत आहेत.