चोपडा (प्रतिनिधी ) – शहरातील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील साने गुरुजी वसाहतीजवळ दोन गटांमध्ये हाणामारी झाली.
पहिल्या फिर्यादीनुसार काल दुपारी गुलाम रसूल मोमीन याने मित्रांसह शहरातील साने गुरुजी वसाहतजवळ आकाश भोई यास रस्त्यावर अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. गुलाम रसुल मोमीन याने दगडाने भोई यास मारहाण केली. आकाश भोई याच्या फिर्यादीवरून आरबाज पठाण, कलीम हलवाई, शाबीर हलवाई, गुलाम मोमीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात शिवाजी भोई, आकाश भोई, आरबाज अजीज खान पठाण, कलीम शेख सलीम हलवाई, शाबीर शेख सलीम हलवाई, गुलाम रसूल मोमीन (सर्व रा. सानेगुरुजी वसाहत चोपडा) यांच्यावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिवाजी भोई, आकाश भोई, अरबाज पठाण, शाबीर हलवाई, कलीम शेख हलवाई यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दुसर्या फिर्यादीनुसार गुलाम रसुल मस्तान मोमीन हा २९ रोजी दुपारी घरी जात असताना, साने गुरुजी वसाहतीकडील सार्वजनीक शौचालयासमोर आकाश भोई याने, गुलाम मोमीन याला धमकावत मारहाण केली. आकाश भोई याने मोमीनच्या गळ्यावर चाकूने वार करुन दुखापत केली. गुलाम रसुल मस्तान मोमीन याच्या फिर्यादीवरून शिवाजी भोई, आकाश भोई यांच्याविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.