यावल ( प्रतिनिधी ) – बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्ग परिसरात विना परवाना सागवान लाकडाच्या वाहतूकीवर यावल वनविभागाने कारवाई केली असून ८ हजार रुपये किंमतीचे सागवान लाकूड जप्त केले आहे. यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील बुऱ्हाणपुर-अंकलेशवर या राज्य मार्गावरील मशीद परिसरात विनापरवाना सागवान लाकडांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती यावल वनविभागाच्या पथकाला गुरूवारी सायंकाळी मिळाली. वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पी. व्ही. हाडपे यांच्यासह पश्चिम वनक्षेत्र पथकातील वनपाल , वनसंरक्षक , पोलीस नाईक , वाहनचालक यांनी कारवाई करत सायंकाळी विनापरवाना वाहतूक होत असलेले ८ हजार रूपये किंमतीचे सागवान लाकुड ९ नग १३० घनमीटर जप्त करण्यात आले. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.