रावेर ( प्रतिनिधी ) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुऱ्हाणपुर- अंकलेश्वर महामार्गावरील चार ढाब्यांवर छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
कर्तव्यात कसूरचा ठपका ठेवत यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ४ जणांना जुलै महिन्यात निलंबित केले होते. रावेर तालुक्यात जेवणाच्या ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याने गुरूवारी रात्री महामार्गला लागून असलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यात आली खिर्डी, पाल, चिनावल परिसरातदेखिल कारवाई करण्याची तत्परता दाखवावी अशी मागणी होत आहे.
यावल-बुऱ्हाणपूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली देशी दारू, विदेशी दारू, बियर असा 9 हजार 120 रूपयांचा उद्देमाल जप्त करण्यात आला तिन ठिकाणी निरंकाचे पंचनामे करण्यात आल्याची माहीती दुय्यम निरिक्षक टेंगळे यांनी दिली.