जळगाव ( प्रतिनिधी ) – वीज तारांच्या स्पर्शाने बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे तरुण पेंटरचा शाॅक लागून मृत्यू झाला. रवींद्र दशरथ तायडे (वय ३३, रा.दादा नगर ) असे मृताचे नाव आहे.
नाडगाव येथील रहिवाशी रवींद्र तायडे गुरुवारी सकाळी नाडगावातील शाहुनगर भागात संतोष मतोडे यांच्या घराच्या छतावरील भिंतीला रंग देत हाेते. तेथून विजेच्या तारा गेल्या हाेत्या. त्या तारांना तायडे यांचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, १३ व १० वर्षीय दोन मुले असा परिवार आहे. बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.