• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात ३३८ ग्राहकांना वीजजोडणी

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणी घेण्याची सुवर्णसंधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2021
in महाराष्ट्र
0

जळगाव/धुळे/नंदुरबार – अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने १४ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलातील ३३८ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०२१ पर्यत या योजनेचा लाभ घेता येणार असून गरजू नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात १४ एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्‍याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत जळगाव परिमंडलात आजपर्यंत ३३८ अर्जदारांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. यात जळगाव मंडलात १९६, नंदुरबार मंडलात ७२ तर धुळे मंडलात ७० ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. तर परिमंडलात ७० ग्राहकांना वीजजोडणी देण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रे उदा.आधार कार्ड, रहिवासी दाखला इ. आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थ्यास ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे एक रकमी जमा करण्याचा अथवा सदर रक्कम ५ समान मासिक हफ्त्यांमध्ये वीजबिलाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल. महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांत वीजजोडणी देण्यात येईल. अर्जदारास वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून काम प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीजजोडणी देण्यात येईल.


 

 

Previous Post

दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू

Next Post

एकाच दिवशी साडेएकोणीस लाखांचे वीजबिल भरून १९ शेतकरी कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकाच दिवशी साडेएकोणीस लाखांचे वीजबिल भरून १९ शेतकरी कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon