भुसावळ ( प्रतिनिधी ) – अवैध गॅस फिलींग गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख सूत्रधार वसीम अब्दूल मशीद पटेल याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
पटेल कॉलनीत गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षका बी.जी. शेखर यांच्या पथकाने कारवाई केली होती. ९ घरगुती सिलिंडरसह दोन रिक्षा व अन्य मिळून १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गॅस वाहनात भरणारा सलमान अब्दुल माजिद पटेल (वय ३०, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ), रिक्षा चालक आरिफ खान इसाफ खान (वय ३५, जाम मोहल्ला, भुसावळ) व जकाउल्ला खान असदउल्ला खान (वय ४३, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) यांना अटक केली होती.
मुख्य संशयित वसीम पटेल पसार होता. तो वरणगावरोड भागात आल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. आता अवैध गॅस फिलींग करणार्यांचे रॅकेट गजाआड झाले आहे.