यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील म्हैसवाडी येथे ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
म्हैसवाडी येथील ३० वर्षीय विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १३ नोव्हेंबररोजी विवाहिता घरी असतांना गावातील समाधान नारायण कोळी हा तरूण त्यांच्या घराच्या जिन्याजवळ आला. संशयित आरोपीने विवाहितेचा हात पकडून शरीरसुखाची मागणी केली. याला नकार दिल्याने तुझ्या मुलांसह तुला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली व अश्लिल शिवीगाळ केली. विवाहितेने फैजपूर पोलीसात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून १५ नोव्हेंबररोजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात समाधान कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहेत.