चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगावात आज भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलीक यांच्या पुतळ्याची होळी करण्यात आली.
हसीना पारकरसोबत नवाब मलिकचे संबंध, अंडरवर्डची जमीन त्यांनी कवडीमोल भावाने खरेदी केली ही कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 20 लाखात विकत घेतली त्यावेळी ते मंत्री होते आपल्या मंत्रीपदाचा स्वार्थासाठी गैरफायदा मालिकांनी घेतल्याचे दिसून येते. माफिया, दशहतवादी, राष्ट्र विरोधी शक्तींशी संबंध असल्याचे सिद्ध होते असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत चाळीसगाव भाजपच्यावतीने मालिकांच्या पुतळ्याची होळी करण्यात आली या प्रसंगी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष .के बी साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा सुनील निकम , शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे,प स गटनेते संजय पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे, नगरसेवक चंद्रकांत तायडे, नगरसेवक सोमसिंग पाटील, शहर सरचिटणीस जितू वाघ, अमोल नांनकर, सरचिटणीस गिरीश बरहाटे, डॉ महेंद्रसिंग राठोड, कैलास पाटील, राहुल पाटील, कैलास गुजर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.