जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलीस कर्मचारी महिलेला अश्लिल शिवीगाळ करून मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ५३ वर्षीय महिला पोलीस आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्या जळगाव जिल्हा पोलीस दलात नोकरीला आहेत. २४ ऑक्टोबररोजी दुपारी ते रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आरोपी अनिल चुडामण तायडे (रा. जळगाव) याने महिलेला तिच्या घरात जाऊन अश्लिल शिवीगाळ केली. दुचाकीचे सीट फाडून नुकसान केले आणि मुलाला मारून टाकेल अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहेत .